गुरुकुल इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Foto
पैठण, (प्रतिनिधी): गुरुकुल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला.

या प्रसंगी संस्थेच्या आधारस्तंभ शशिकला लखमले, संचालिका नयना लखमले, संचालिका सारिका लखमले, अदित लखमले, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनीता पाठक तसेच संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी लखमले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी आरती चोरमारे, जोयबा शेख, रामकन्या बनगर, दीपिका सागर शिंदे यांनी आपल्या शालेय आठवणी सांगून भावना व्यक्त केल्या. शाळेतील आठवणींना उजाळा देताना भक्ती दहिभाते, राजरत्न चाबुकस्वार, वैभवी चाबुकस्वार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. 

तसेच यावेळी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील शिक्षकवृंद वर्षा कुलकर्णी, सोनल बाहेती, शुभांगी कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी लखमले तसेच प्रमुख अतिथी निवृत्त मुख्याध्यापिका सुनीता पाठक यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील शैक्षणिक व भावी आयुष्यासाठी यशस्वी वाटचाल घडावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.

सूत्रसंचालन विद्यार्थिनी तेजश्री भोसले व कार्तिकी भोसले यांनी केले. यावेळी शितल खरात, वैशाली बोरूडे, रंजना गायकवाड, विशाखा गंगावणे, कार्तिकी रोडगे, कांचन बनसोडे, मुबशेरा शेख, गायत्री देशमुख, भक्ती मुंदडा, राणी काकडे, सपना पोपळघट, सोमेश फतपुरे, भागवत बनसोडे आदी शिक्षक उपस्थित होते. एकूणच हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय व संस्मरणीय क्षण ठरला. आभार प्रदर्शने या कार्यक्रमाची सांगता झाली.